जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची पत्रपरीषदेत माहिती
धुळे- आमदार अनिल गोटे नाही यांच्याशी आमचा काही संबंध नाही. धुळ्यात गुंडगिरी आहे, असे सांगण्याचा अधिकार गोटे यांना नाही, असे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आयोजित पत्रकार परीषदेत सांगितले. यावेळी संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे मंत्री जयकुमार रावल आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. त्यावेळी ना. महाजन बोलत होते. धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी भाजपतर्फे विकास जाहीरनामा सादर करण्यात आला. या जाहीरनाम्यात 15 सूत्री कार्यक्रम दिला, त्यावेळी मंत्री महाजन बोलत होते.
मतदारांनी न घाबरता मतदान करण्याचे आवाहन
धुळ्यातील नागरिकांनी भाजपाला साथ देऊन 50 पेक्षा जास्त उमेदवार निवडून आणावेत, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले. धुळे शहराला रोज पिण्याचे पाणी देऊ .पाणी योजना वर्षभरात मार्गी लावू आणि धुळेकरांनी भाजपच्या हातात सत्ता देण्याची मानसिकता तयार केली आहे. धुळ्यात गुंडगिरी आणि ब्लॅकमेल करण्याचा प्रकार वाढला आहे त्यामुळे धुळे शहराचा विकास खुंटला आहे असेही मंत्री महाजन म्हणाले राज्यातील 80 टक्के महापालिका भाजपच्या ताब्यात आहेत नांदेड आणि मुंबई महापालिका सोडली तीर अन्य महापालिका भाजपच्या ताब्यात आहेत धुळेकर नागरिकांनी धुळेकर नागरिकांनी याबाबत विचार करावा असेही मंत्री म्हणाले. धुळे शहरातील नागरिकांना भाजपतर्फे आव्हान करण्यात आले होते त्यानुसार 16 हजार 700 नागरिकांनी भाजपला सूचना केल्या आहेत त्यानुसार भाजपने हा विकासनामा धुळे कारण समोर ठेवला आहे. धुळेकरांनी कोणालाही न घाबरता मतदान करावे असे आव्हान गिरीश महाजन यांनी केले.
50 पेक्षा अधिक जागा आम्ही जिंकणार
यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे म्हणाले की धुळे महानगर पालिकेवर भाजपा सत्ता आणि 50 पेक्षा जास्त जागा आम्ही जिंकू असे मत व्यक्त केले. मंत्री भामरे यांनी विकास नामातील 15 सूत्री कार्यक्रम वाचून दाखवला. यावेळी ते म्हणाले की धुळे शहरात वेगवान रस्ते, मूलभूत सुविधा, पाणीपुरवठा, महिलांचे सक्षमीकरण, राष्ट्रभक्ती, बेरोजगार तरुणांना रोजगार, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात विकास कामे करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.