धुळे। हदगाव ते उमरखेड रस्त्यावर पैनगंगा नदिवरील पुलावर आमदार अनिल गोटे यांचे बंधु ज्ञानेश्वर गोटे व त्यांची पत्नी रत्ना ज्ञानेश्वर गोटे यांच्यासह वाहन चालकांचा अपघाती मृत्यु झाल्याची घटना शुक्रवारी 25 रोजी घडली. त्यांच्या वाहनाला पाठीमागून येणार्या वाहनाने धडक दिल्याने तसेच नदीवरील पुलाला कठडे नसल्यामुळे कार नदीत कोसळली.
यातच तिघांचा मृत्यु झाला. ट्रक चालक घटना स्थळावरस्थळावरून पसार झाला. हदगाव पोलीसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. पोलिस निरीक्षक केशव लटपटे यांच्यासह पोलीस कर्मचार्यांनी अपघातस्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने मदत कार्य सुरु करून मृतदेह बाहेर काढले. मृतदेह हदगाव येथील उपजिल्हारुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. आमदार अनिल गोटेंनी अपघाताची दुखःद घटना दिल्ली येथे असतांना कळाली. मुख्यमंत्र्यांनी भ्रमणध्वनीवर माझे सांत्वन केले. तसेच शासकीय पातळीवर आवश्यक त्या सूचनाही दिल्यात. पुतणी मुंबईस नोकरीला आहे. ती रात्री पोहोचेल असे सांगितले.