धुळे । तुम्ही आम्हाला काडीचीही किंमत देत नाहीत असे म्हणतात. मग उठसुट पत्रकबाजी करुन वळवळ कशाला करतात? स्वामी नारायण मंदीराची भिंत पाडल्यानंतर शेपूट घालून पळ काढला होता. ट्रस्टींनी भाजपा अध्यक्ष अमित शहा यांना सागूंन तुमचा बंदोबस्त करुन तुमच्या थोबाडीत मारलेली विसरलात का? असे शिवसेनेने आ.गोटे यांना नाव न घेता सुनावले आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांनी पत्रकात म्हटले आहे की, नदीकाठचे मंदिरे पाडून तुम्ही बदनामी केली.त्याविरोधात निवेदन मोर्चा धरणे आंदोलन केलेत. तर तुमचे पित्त का खवळले? धर्माचे आणि जातीचे राजकारण तुम्हीच केले. पत्रकबाजी,दिशाभुल,बुध्दीभेद या शिवाय दुसरे काहीही केले नाही.तुम्हाला जर खरच मनुष्य समजलं असतं तर तुम्ही तुमचा शब्द फिरवला नसता.25 हजार तरुणांना रोजगार मिळाला असता.
गुंडगिरी नष्ट करणाच्या केवळ वल्गना
तत्कालिन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्याकडे लोटांगण घालून शिवतिर्थाची जागा मिळविली आणि सुरु केले धर्माचे राजकारण. तेलगीला सोबत घेवून स्टम्ॅप विक्र ीचा परवानाही मिळवनू दिला. तेलगीच्या पैशावर शिवतिर्थ, शहिद अब्दुल हमीद यांचे स्मारक उभारले. शहरातील अगदी अरुंद रस्त्यात तुम्ही चौक सुशोभिकरण केले. मात्र गावाबाहेर नदीकाठावरचे मंदिर चालत नाही. आम्हाला इक्तार पार्टीला बोलविले. म्हणून आम्ही टोप्या घातल्या. तुम्ही तर वेळोवेळी जातीचे-धर्माचे राजकारण केले. तुम्ही दुसर्याला किंमत दिली असती. तर,तुम्ही तुमच्या 40-45 वर्षाच्या राजकारणात फार मोठे झाला असतात. मात्र 50 वर्षात आमदारच आहात. तुमच्या वयाचे आणि एवढी वर्षे राजकारणात घातलेले लोक मंत्री, मुख्यमंत्री झाले असते. गुंडगिरी नष्ट करु अशा केवळ वल्गना करतात. गडु ्ड्याचा खुन झाल्यानंतर तुम्ही देशभक्त शहिद झाल्याच्या अवीरभावात अॅड. उज्वल निकमांची नियुक्ती खटल्यासाठी करायला लावली. यामागे मतांच्या राजकारणाशिवाय दुसरे काय असू शकते, असा सवालही माळी यांनी केला आहे.