पाचोरा: पाचोरा तालुका सहकारी संस्था ही केवळ आमच्या एकट्याच्या मालकीची नसून या संस्थेवर 35 संचालक काम करतात गेल्या 2012 (मे) पासून सहकारी संस्थेत शासनाने नोकर भरती बंद केली आहे. याचा अर्थ आमदार किशोर पाटील यांना सहकाराचे नॉलेज फार कमी आहे. सहकारामध्ये काम करित असतांना आमच्या दोन पिढ्या झाल्या यामुळे आमदारांनी आम्हास सहकाराविषयी शिकवू नये अशी बोचरी टीका माजी आमदार दिलीप वाघ यांनी आमदारांच्या पत्रकार परिषदेला उत्तर देत असतांना पत्रकार परिषदेचे आयोजन करून माहिती दिली.
मा.आ. दिलीप वाघ यांची पत्रपरिषदेत माहिती
मा. आ. दिलीप वाघ यांचे निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेस राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ता खलील देशमुख, तालुका अध्यक्ष विकास पाटील उपस्थिथ होते. यावेळी पत्रकारांशी बोलतांना माजी आमदार दिलीप वाघ पुढे बोलतांना म्हणाले की, गेल्या 2 मे 2012 पासून शासनाने शिक्षक शिक्षकेतर भरती बंद केली असून त्यांनी केलेला आरोप बिनबुडाचा आहे. मी जर कोणत्याही कर्मचार्यांकडुन पैसे घेतले असतील तर त्यांनी ते सिद्ध करून दाखवा जर सिद्ध करून दाखविल्यास मी माझ्या पदाचा राजीनामा देईन. पैसे घेण्याचे सिद्ध न झाल्यास त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा. संस्थेत 35 संचालक असून वेगवेगळ्या हायस्कुलमध्ये अनेकांना शालेय समिती चेअरमन म्हणून मान दिला जातो. असाच मान आम्ही दहिगाव संत येथील हायस्कूलचे चेअरमन म्हणून माजी आमदार आर. ओ. पाटील यांना दिला होता. त्यावेळी मा. आमदार आर. ओ. पाटील यांनी त्यांचे नातेवाईक संस्थेत लावतांना किती पैसे घेतले याचा खुलासा करावा. आमदार किशोर पाटील यांनी शेतकर्यांच्या पाणलोट क्षेत्रातील मदत, ठिबक अनुदान मिळाल्याकडे लक्ष द्यावे. केवळ कर्ज माफीचे फार्म भरून शेतकर्यांची दिशाभूल करू नये असेही दिलीप वाघ यांनी आमदार किशोर पाटील यांचेवर टीकास्त्र सोडले.