आमदार उदेसिंग पाडवी बनले काँग्रेसचे दूत

0

* भाजपाच्या जिल्हाध्यक्षा डॉ.हिना गावित सणसणीत आरोप

नंदुरबार । मी केलेल्या नियुक्त्या कोणीही रद्द केलेल्या नाहीत. माझी राजकीय सुरूवातच मुळात भाजपातून झाली असल्याने माझ्या भुमिकेवर किंवा नियुक्त्यांवर कोणी संशय घेण्याचे कारण नाही. आमदार उदेसिंग पाडवी हे काँग्रेसचे दूत बनून बोलत आहेत, अशा सणसणीत शब्दात भाजपाच्या जिल्हाध्यक्षा डॉ.हिना गावित यांनी आ.उदेसिंग पाडवी यांच्या आरोपांना उत्तर दिले आहे. विविध विकास योजनांचा जनतेला लाभ पोहोचावा म्हणून जिल्हयात ठिकठिकाणी ग्रामस्वराज्य अभियानांतर्गत मेळावे घेवून केलेल्या कामाची माहिती देण्यासाठी भाजपाच्या जिल्हाध्यक्षा डॉ.हिना गावित यांनी काल 27 जुलै रोजी पत्रकार परिषद घेतली. डॉ. हिना गावित यांनी केलेल्या पदाधिकार्यांच्या नियुक्त्या वरिष्ठांनी रद्द केल्या असून राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांच्या भरणा केला जात असल्याची माहिती दोन दिवसापूर्वीच भाजपाचे तळोदा येथील आमदार उदेसिंग पाडवी यांनी पत्रकार परिषद घेवून दिली होती. त्या पार्श्‍वभुमीवर पत्रकारांच्या प्रश्‍नांवर स्पष्टीकरण देतांना त्यांनी हे प्रतिउत्तर दिले.

विविध योजनांची दिली माहिती
दरम्यान, योजनांची माहिती देतांना डॉ. हिना गावित यांनी सांगितले की, जिल्हा विस्तारीत ग्रामस्वराज्य अभियान 11 जुलै ते 26 जुलै या कालावधीत अतिशय गंभीरतेने राबवण्यात आले. रोज प्रत्येक तालुक्यात एक मेळावा अशा प्रकारे जिल्ह्यातील 55 जिल्हा परिषद गटांमध्ये अभियान राबविण्यात आले. जिल्हयातील 1000 वस्तींपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या 547 गावांमध्ये केंद्र सरकारच्या विविध 7 योजनांचा लाभ देण्यात आला. प्रत्येक ठिकाणी मेळाव्यांना भर पावसातदेखील लाभार्थीची उपस्थिती हजारोंच्या संख्येने होती, असा दावा खा.डॉ.हिना गावित यांनी केला. योजना निहाय माहिती देतांना त्या म्हणाल्या की, पंतप्रधान उज्वला गॅस योजना उद्दिष्ट फॉर्म होते 54469, जमा झालेत 27412, प्रत्येक्षात जोडणी 6952, आणि वाटप करायचे राहिलेले 10700. पंतप्रधान सौभाग्य योजना (हर घर बिजली) अंतर्गत 140772 घरांपैकी 118543 घरांना वीज जोडणी देण्यात आली. प्रधानमंत्री उजाला योजनेतंर्गत आतापर्यंत 8000 बल्बचे वाटप करण्यात आले. प्रधानमंत्री जनधन योजनेंर्तगत 18909 खाते उघडण्याचे उद्दिष्ट होते. पैकी 96179 लोकांचे खाते उघडून 85.50 टक्के लक्षांक साधण्यात आला.