आमदार उन्मेष पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

0

चाळीसगाव। आमदार उन्मेष पाटील यांचा वाढदिवस चाळीसगाव येथे शनिवार 24 जुन 2017 रोजी विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. आमदार उन्मेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छ व सुंदर चाळीसगाव या अभियानाची सुरुवात झाली. त्याप्रसंगी शहरातील रस्त्यांच्या मध्यभागी असलेल्या दिवायडर स्वच्छ करून त्यांना रंगरंगोटी करण्यात आली व वृक्षारोपण करण्यात आले. वसुंधरा फाउंडेशनतर्फे वहितुला हा अभूतपूर्व कार्यक्रम पार पडला.

पंचायत समितीसमोर रक्तदान शिबीर
त्यावेळेस गरीब विद्यार्थ्यांना वह्या वाटण्यात आल्या, आरोग्याचे प्रश्न समोर ठेवत पंचायत समिती आवारात रक्तदान शिबिर राबविण्यात आले. त्याप्रसंगी अनेक कार्यकर्त्यांनी व पदाधिकार्‍यांनी रक्तदान केले, शेवटीसर्वांच्या आरोग्याबाबतचा प्रश्न असलेला चाळीसगाव नगरीतील नद्या स्वच्छ करण्याचे कामाची पाहणी आमदार पाटील यांनी केली.

उपक्रमात यांचा होता सहभाग
आमदार उन्मेष पाटील, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, पं.स. उपसभापती संजय पाटील, राजेंद्र चौधरी, घृष्णेश्वर पाटील, विश्वस चव्हाण, नगरसेवक चंदू तायडे, बाळासाहेब मोरे, चिराउद्दीन शेख, सोमसिंग राजपूत व इतर सन्माननीय कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.