आमदार उन्मेष पाटील यांच्याहस्ते वृक्षारोपण

0

चाळीसगाव । शासनाच्या 4 कोटी वृक्ष लागवड या महत्वाकांक्षी कार्यक्रमाचा 1 जुलै रोजी शुभारंभ झाला आहे. चाळीसगावात आमदार उन्मेश पाटील यांच्या हस्ते बी.पी.आर्ट्स, एस.एम.ए.सायन्स, के.के.सी.कॉमर्स महाविद्यालयाच्या पटांगणात वृक्ष लागवड करण्यात आली. वनविभागामार्फत वृक्षलागवड कार्यक्रमातंर्गत नगराध्यक्षा आशालता चव्हाण, प्रांताधिकारी शरद पवार, तहसिलदार कैलास देवरे, प्राचार्य डॉ.पी.एस.बाविस्कर, मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालसिंग, विश्‍वास चव्हाण, रवी राजपूत, नरेंद्र जैन, शेषराव पाटील, नायब तहसिलदार, महसूल कर्मचारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

तालुक्यतील प्रत्येक ग्रामपंचायतीस 375 रोपे वनखात्यांमार्फत जागेवर पोहोच करुन देण्यात आली. सप्ताहांतर्गत हे वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. 40 हजार पाचशे रोपे पुरविण्यात आले आहे. शासकीय कार्यालयात 28 हजार, वनीकरण व वन विभागातर्फे 23 हजार वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. वनविभागाच्या रोपवाटीकेत व राजदेहरा रोपवाटीकेतुन रोपे उपलब्ध करुन देण्यात आले आहे. सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी अझादुद्दीन शेख, प्रकाश पाटील, संजय जाधव, संजय चव्हाण, पी.पी.गवारे, बाळू शितोळे, मना माळी, सुभाष सोनवणे, संजय देवेरे आदी परिश्रम घेत आहे.