आमदार उन्मेष पाटील यांच्या पाठपुराव्याने शेतकर्‍यांना दिवाळीपूर्वी दिलासा

0

बोंडअळी अनुदानापासून वंचित असलेल्या शेतकर्‍यांचे 23 कोटी तहसील प्रशासनाला प्राप्त

चाळीसगाव- गत महिन्यात जळगाव जिल्हा दौर्‍यावर आलेले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार, नुकतेच दुष्काळ पाहणीसाठी चाळीसगाव तालुका दौर्‍यावर आलेले राज्याचे महसूलमंत्री व जळगा चे पालकमंत्री चंद्रकांत पाटील व विकासकामांच्या भूमिपूजनासाठी आलेले गिरीश महाजन यांच्याकडे बोण्डअळी अनुदानापासून वंचित असलेल्या शेतकर्‍यांचे गार्‍हाणे आमदार उन्मेष पाटील यांनी मांडले होते. त्यावेळी पालकमंत्र्यांनी कुठल्याही परीस्थितीत दिवाळी पूर्वी शेतकर्‍यांचे सदर अनुदान प्रशासनाकडे जमा करू, असे आश्वासन दिले होते. दिलेला शब्द पाळत बुधवारी तहसील कार्यालयात 23 कोटी रुपये अनुदान जमा झाले असून 27 बागायत गावातील शेतकर्‍यांना 11 कोटी 19 लाख अनुदान तर जिरायत 49 गावातील शेतकर्‍यांच्या खात्यात चार कोटी 77 लाख अनुदान वाटप याद्या तयार झाल्या असून लवकरच शेतकर्‍यांच्या खात्यात रक्कम वर्ग करण्याचं काम तहसील कार्यालयामार्फत करण्यात येणार आहे. नापिकी व दुष्काळामुळे त्रस्त बळीराजाला संवेदनशील सरकार व आमदार उन्मेष पाटील यांनी ही दिवाळीपूर्वी दिलासादायक बातमी दिल्याने समाधान व्यक्त होत आहे.