आमदार किशोर पाटील यांनी केली दोन लाखाची मदत

0

पाचोरा । तालुक्यातील पिंपळगाव हरेश्‍वर येथील कैलास मोतीराम माळी यांच्या दोन्ही मुलांचे घोडसगाव धरणात बुडुन मृत्यु झाल्याची घटना मंगळवारी 16 रोजी घडली. कैलास माळी हे अपंग असून घरातील कर्ते गेल्याने या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

यांची उपस्थिती
या कुटुंबाला आर्थिक पाठबळ मिळावे यासाठी पाचोरा तालुक्याचे आमदार किशोर पाटील यांनी दोन लाखाची मदत दिली आहे. कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सात्वन करीत त्यांना मदतीचा धनादेश सुपुर्द केला. यावेळी उध्दव मराठे, सुकदेव गिते, कापसे, रवी गिते, भगवान पाटील, किरण टेलर, नाना सरकार आदी उपस्थित होते.