आमदार खडसेंच्या कृषी विद्यापीठाबाबतच्या भूमिकेचे कृती समितीतर्फे स्वागत

0

खान्देशातच नवे कृषी विद्यापीठ व्हावे यासाठी आमदार खडसे आग्रही

धुळे । कृषी विकास घडवून आणण्यासाठी खान्देशसाठी स्वतंत्र कृषी विद्यापीठ व्हावे, मी सत्तेत असो वा नसो, खान्देशसाठी कृषी विद्यापीठ होण्रासाठी माझी भूमिका कारम राहणार आहे, असे जाहीर वक्तव्य राज्याचे माजी महसूलमंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी शहादा रेथे केले. यांच्या या भूमिकेचे धुळे जिल्हा कृषी विद्यापीठ निर्माण कृती समितीचे निमंत्रक व माजी आमदार प्रा.शरद पाटील रांनी जाहीर स्वागत केले आहे. मंगळवारी आमदार खडसे यांनी शहादा येथील कृषी विद्यालयाच्या इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी जाहीर केले होते. यावर प्रा.शरद पाटील प्रतिक्रिया जाहीर केली. प्रा.शरद पाटील रांनी 2009 ते 2014 रा दरम्यान कृषी विद्यापीठाच्या विषयावर विधानपरिषदेत चर्चा घडवून आणली आहे. कृषी विद्यापीठाची मागणी त्यांनी लावून धरली होती.

हिवाळी अधिवेशनात घोषणा होण्याची शक्यता
अर्थसंकल्पीय अधिवेशनात कृषी विद्यापीठ स्थापनेबाबत घोषणा होऊ शकते. यासाठी धुळे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह कृषी विद्यापीठ निर्माण कृती समितीला जागरुक रहावे लागणार आहे. आमदार खडसे यांच्या सकारात्मक विधानामुळे कृषी विद्यापीठ धुळ्यातच निर्माण होईल अशी आशा निर्माण झाली आहे. कृषी विद्यापीठ निर्माण कृती समिती येत्या सप्टेंबर महिन्यात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना घेऊन राज्यपालांची भेट घेणार असल्याची माहिती समितीचे निमंत्रक प्रा.शरद पाटील यांनी दिली आहे.

इतिवृत्तात नोंद
2009 ते 2014 रा कालखंडात प्रा.शरद पाटील हे महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठावर विधानसभा सदस्य म्हणून शासन नियुक्त कार्यकारी संचालक असताना विद्यापीठाच्या प्रत्येक वार्षिक सभेत राहुरी कृषी विद्यापीठाच्या विभाजनानंतर निर्माण होणारे नवीन कृषी विद्यापीठ हे धुळे जिल्ह्यातच व्हावे, अशा प्रकारचा आग्रही मुद्दे उपस्थित करत कृषी विद्यापीठ सभेच्या इतिवृत्तात नोंद घेण्यात आलेली आहे.

पुस्तिकेचे वाटप
सन 2015 च्या जानेवारी महिन्यात धुळे जिल्ह्यात कृषी विद्यापीठ निर्माण कृती समिती स्थापन करुन याप्रश्‍नी सर्वपक्षीय सहमती निर्माण केली आहे. शिवार नंदुरबार, नाशिक, जळगाव, धुळे जिल्ह्यालगत असणार्‍रा चार तालुक्रातील लोकप्रतिनिधी व जनतेचे मत अनुकूल करुन घेण्यास समितीचे निमंत्रक या नात्याने प्रा.शरद पाटील रांनी रशस्वी झाले आहेत. तसेच कृषी विद्यापीठ धुळे जिल्ह्यातच व्हावे, रासाठी शरद पाटील रांनी संपादित केलेली अभ्रासपुर्ण पुस्तिकेच्रा 20 हजार प्रती चारही जिल्ह्यात वितरीत केल्या असून विद्यापीठ होण्याच्या दृष्टीने अनेकांनी मत व्रक्त
केले आहे.