आमदार खडसेंच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

0

मुक्ताईनगर । आमदार एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त 2 सप्टेंबर रोजी शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 1 रोजी खडसे महाविद्यालयात ऑर्केस्ट्रॉ कार्यक्रम होईल, 2 रोजी भव्य सत्कार समारंभ, जेडीसीसी बँकेसमोर डॉ. बी सी. महाजन, सचिन भोंबे यांच्याकडुन लाडु तुला, दुपारी 3 वाजता फळे वाटप होईल तसेच सायंकाळी 4 वाजता खडसे महाविद्यालयात संवेदना फाउंडेशन व खडसे महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने भव्य दंत तपासणी शिबीर आदी विवीध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमासाठी बेटी बचाव बेटी पढावचे राष्ट्रीय समन्वयक डॉ राजेंद्र फडके, खा रक्षा खडसे, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा अ‍ॅड.रोहिणी खडसे -खेवलकर, जिल्हा सरचिटणीस प्रा.डॉ सुनील नेवे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदू महाजन, आमीर साहेब, विधानसभा क्षेत्रप्रमुख रमेश ढोले, शिवाजीराव पाटील, पंचायत समिती सभापती शुभांगी भोलाणे, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटीले आदी उपस्थित राहतील. उपस्थीतीचे आवाहन भाजपा तालुका सरचिटणीस सतीश चौधरी यांनी केले. आहे.