आमदार खडसे आज करणार शेती शिवार पाहणी

0

मुक्ताईनगर। माजी महसूलमंत्री आमदार एकनाथराव खडसे हे शनिवार 27 रोजी तालुक्यातील काही भागातील शेती शिवार पाहणी करून शेतकर्‍यांशी संवाद साधणार आहे. यावेळी शेतकर्‍यांनी त्यांच्या काही समस्या असल्यास आमदार खडसे यांच्याकडे मांडाव्यात, असे आवाहन केले आहे. आमदार एकनाथराव खडसे आपल्या मतदार संघातून शेतकर्‍यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी तालुक्यातील दौरा काढला आहे. त्यामुळे ज्या काही अडचणी असतील त्या शेतकर्‍यांनी संवाद साधून व्यक्त कराव्यात असेही आवाहन केले.

यांची राहणार उपस्थिती
सकाळी 10 वाजता चिंचखेडा बुद्रुक, दुपारी 1 वाजता हिवरा, संध्याकाळी 7 वाजता हरताळा शिवार हनुमान मंदिर हरताळा फाटा असा दौरा असून यावेळी खासदार रक्षा खडसे, डॉ. राजेंद्र फडके, जिल्हा बँक अध्यक्षा अ‍ॅड. रोहिणी खडसे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर, विधानसभा क्षेत्रप्रमुख रमेश ढोले, बोदवड बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विलास धायडे, जिल्हा चिटणीस राजू माळी, पंचायत समिती सभापती शुभांगी भोलाणे, उपसभापती प्रल्हाद जंगले आदी उपस्थित राहणार आहेत.

उपस्थित राहण्याचे केले आवाहन
यावेळी आपआपल्या भागात जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांनी तसेच सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सरपंच यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपा तालुकाध्यक्ष दशरथ कांडेलकर, सतिष चौधरी, डॉ. बी.सी. महाजन, तालुका सरचिटणीस संदीप देशमुख यांनी केले आहे.