आमदार गोटे आणि सतीश मांगले यांचा ब्लॅकमेलींगचा धंदा

0

भामेर । दरमहा समृद्धी महामार्गाचा प्रमुख असलेल्या राधेश्याम मोपलवार यांना ब्लॅकमेल करुन त्यांच्याकडे 10 कोटींची खंडणी मागणार्‍या सतिष मांगले याला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, खंडणीखोर मांगले हा आमदार अनिल गोटेंचा मानसपुत्र आहे. ब्लॅकमेलिंग प्रकरणाचा व्यवस्थित तपास केला तर खंडणी प्रकरणाचे धागेदोरे धुळ्यापर्यंत पोहचतील आमदार गोटे आणि त्यांचा मानसपुत्र मांगले यांचा ब्लॅकमेलिंगचा धंदा आहे. तोडीपाणीसाठी पोलिस दलाचा वापर आमदार गोटे करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मनोज मोरे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकाद्वारे आरोप केला आहे. 3 नोव्हेंबर रोजी खंडणी विरोधी पथक ठाणे यांनी मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गचे माजी प्रमुख राध्येशाम मोपलवार यांच्याकडे 10 कोटीची खंडणी मागणार्‍या धुळे येथील आमदार गोटे यांचे मानसपुत्र असलेल्या डटेक्टीव एजन्सी माध्यमातून ब्लॅकमेलिंगचे धंदे करणार्‍या सतीष मांगले व त्याची पत्नी श्रद्धा मांगले हिला अटक केली.

पोलीसात खोटी तक्रार
11 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केलेल्या क्लिपमध्ये याच सतीष मांगलेचे अपहरण केल्याची खोटी तक्रार सातारा पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाली होती. नंतर त्या प्रकरणी चौकशी मुंबई क्राईम ब्रंचकडे देण्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची प्रत नागपूर येथे येवून घेऊन जा व ठरलेल्या व्यवहाराचे राहीलेली रक्कम नवीन करन्सी मध्ये आणून दे अशी मागणी आमदार गोटे करत होते. एका ब्लॅकमेलरसाठी खोटी अपहरणाची तक्रार दाखल करून त्या तक्रारीबाबत आ. गोटेंच्या मर्जीतली असलेली मुंबई क्राईम ब्रांचकडे तपास देऊन मग जे काही आरोपी त्यात होते.

क्लिपमध्ये आले नाव
या अटकेमुळे राज्यभर खळबळ माजली. ब्लॅकमेलिंग प्रकरणात आणखी दोन राजकीय बडे नेते असण्याची शक्यता त्या दिवशी माध्यमांमध्ये चर्चीली जात होती. त्यामुळे धुळ्यात तर चर्चेला उधाण आले होते. राष्ट्रवादीने धुळ्यात पत्रकार परिषद घेत आमदार गोटे आणि भिसे यांच्यातील संभाषणाची टेप जगजाहिर केली होती. त्या क्लीपमध्ये मांगलेचे नाव आले होते. हा तोच मांगले का अशी चर्चा त्या दिवशी सुरु होती.

धोगेदोरे धुळ्या पर्यत
या सर्व प्रकरणाची नीट व निपक्षपाती पणे चौकशी झाल्यास हा तपास 100 टक्के धुळ्यापर्यंत येवून पोहचेल हे निश्‍चित. परंतु या प्रकरणातील काहींवर मुख्यमंत्र्यांचा वरदहस्त आहे. त्यामुळे चौकशी फक्त मांगले पर्यंत थांबायला नको.या प्रकरणी जी काही कारवाई व्हायची ती होईलच परंतु या मांगलेची ब्रेनमॅपींग टेस्ट केली तर यातील सर्व व्हाईट कॉलर चोरांची माहिती उघड होऊ शकते. परंतु या मांगलेच्या अटकेमुळे आमदार गोटेंचे खायचे दात वेगळे व दाखवायचे वेगळे हे जनतेसमोर उघड झाले असल्याचे आरोप त्यांनी केले आहे.