आमदार गोटे यांच्या निधीतून ‘चॅनल वॉल’चे भूमिपूजन

0

धुळे । शहरातील सुदर्शन कॉलनीतील नवतेज बाजार समोरील मुख्य रस्त्यालगतची ओपन स्पेस साठी चॅनल वॉल च्या कामाला आमदार अनिल गोटे यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून चॅनल वॉल कंपाऊंड तयार करण्यासाठी 14 लाख 50 हजार रुपये मंजुर केले होते. रविवारी कामाचे भूमिपूजन आमदार अनिल गोटे यांच्या हस्ते करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
यावेळी संघटन मंत्री भिमसिंग राजपूत,माजी उपनगराध्यक्ष दिलीप साळुंखे, भाजपचे ज्येष्ठ नेते संजय बोरसे,माजी नगरसेविका भारती माळी,माजी नगरसेविका वंदना सुर्यवंशी,नगरसेविका वैभवी दुसाने,लोकसंग्रामचे जिल्हा अध्यक्ष प्रशांत भदाणे,सामाजिक कार्यकर्ते राजु महाजन,श्री. कवठळकर दादा,पंकज नगराळे, नितीन म्हसदे,भाजपचे योगेश मुकुंदे, अमित खोपडे, अमित दुसाने लोकसंग्राम,भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच सुदर्शन कॉलनी परिसरात असंख्य नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.