खेड : तालुक्यातील चासकमान धरण 100 टक्के भरल्यामुळे आमदार सुरेश गोरे यांच्या हस्ते धरणाचे जलपूजन करण्यात आले तसेच महिला आघाडी संघटक नंदाताई कड यांचे हस्ते भीमा नदीची खणा-नारळाने ओटी भरण्यात आली.
कार्यक्रमासाठी शिवसेना खेड तालुकाप्रमुख प्रकाशदादा वाडेकर, उपतालुकाप्रमुख संजय घनवट, अंबर सावंत, सहकार नेते नानासाहेब टाकळकर, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अंभियता लोंढे, उपअभियंता मुरडे, शाखा अभियंता राऊत, जि.प.सदस्य बाबाजी काळे, प.स. सदस्य भगवान पोखरकर, किरण मांजरे, सेनाप्रमुख एल.बी. तनपुरे, मा.सरपंच मारुतीशेठ सातकर, राजगुरुनगर सहकारी बँकेचे संचालक सतिश नाईकरे, ग्राहक सरंक्षण कक्षाचे उपजिल्हाप्रमुख सुदामराव कराळे, मा.सरपंच हनुमंतराव कड, जेष्ठनेते सोपानराव घनवट, वाड्याचे सरपंच भगवानराव लांडगे, शिवसेना विभागप्रमूख राजेंद्र गायकवाड, सुभाषराव कदम, शिवसेना शाखाप्रमुख कैलासभाऊ गोपाळे, श्रीनिवास मिंडे, युवानेते अक्षयराव भगत, पाटबंधारे विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शेतकरी, शिवसैनिक व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.