चक्क आमदार चंदू पटेल यांचा कुत्रा चोरीला!

0

जळगाव-जळगावला एक अजब किस्सा घडला आहे. भाजप आमदार चंदूलाल पटेल यांच्या लाब्रोडोर जातीच्या कुत्र्याची चोरी झाली आहे. कुत्राची चोरी केल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. तीन चोरटे मोटारसायकलवरून आमदार पटेल यांच्या घराजवळ आल्याचे दिसत आहे. घराच्या भोवती फिरून चोरट्यांनी रेकी केली. त्यानंतर पटेल कुत्रा पळवून नेले. कुत्रा चोरीला गेल्याने त्यांनी रामानंद पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी शोध सुरु केला आहे.