आमदार चंद्रकांत पाटील यांनी बोदवडमध्ये घेतली आढावा बैठक

0

चढ्या भावाने सामानाची विक्री करणार्‍यांवर कारवाई करण्याचे आदेश

बोदवड : बोदवडमधील संचारबंदीचा फायदा घेत काही किराणा व्यावसायीक चढ्या दराने जीवनावश्यक वस्तूंची विक्री करीत असल्याने अशांवर तातडीने कारवाई कराव्यात, अशा सूचना आमदारांनी अधिकार्‍यांच्या आढावा बैठकीत केल्या. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर तहसीलदार, गटविकास अधिकारी, वैद्यकीय अधिकार्‍यांची त्यांनी बैठक घेतली. कोरोना व्हायरसचे जिल्ह्यात रुग्ण वाढत असून याबाबत सतर्कता बाळगून संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय विशेष लक्ष घालून करण्यात आले पाहिजे. काही मदत लागल्यास मला संपर्क करण्यात यावा, असे आवाहन तसेच सूचना आमदार चंद्रकांत पाटील यांनी केल्या.

ग्रामीण रुग्णालयात सेवा पुरवण्याचे आदेश
वैद्यकीय अधिकार्‍यांना ग्रामीण रुग्णालयांत लक्ष घालून जलद सेवा देण्याबाबत सूचना करण्यात आल्या तसेच बहुतांश गावांत ग्रामसेवक गैरहजर राहत असून गटविकास अधिकार्‍यांना त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना केल्या व तहसीलदार यांना कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी काय उपाययोजना करण्यात आली याबाबत चर्चा करण्यात आली. तहसीलदारांनी शहरातील गर्दीच्या ठिकाणांना बंद केले असून अत्यावश्यक सेवा देणारे किराणा, भाजीपाला, मेडिकल यांना सोशल डिस्टन्स बाबत वर्तूळे आखण्याबाबत जनजागृती सुरू असल्याचे सांगत बाहेरु गावावरून आलेल्यांचे सर्वे करून त्यांना होम क्वारंटाईनचे शिक्के मारले असल्याचे यावेळी तहसीलदारांनी बैठकीत सांगितले.