पिंपरी : श्रीक्षेत्र देहू येथून कासारवाडीमध्ये आलेल्या संतश्रेष्ठ तुकोबारायांच्या पालखीचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी स्वागतासह पालखीरथाचे काहीकाळ सारथ्यही केले. जगताप वारकरी कुटुंबातील आहेत. त्यांच्यासोबतराज्यसभा खासदार अमर साबळे होते. यावेळी जगताप यांच्या हस्ते पालखीची आरती करण्यात आली. परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती.
अॅडव्होकेटस् बार असोसिएशन
पिंपरी : पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेटस बार असोसिएशन अन्नदान करण्यात आले. यावेळी अध्यक्ष अॅड. राजेश पुणेकर, उपाध्यक्ष अॅड. कालिदास इंगळे. अॅड. प्रसन्ना लोखंडे, अॅड. राजेंद्र काळभोर, अॅड. सुनील कड, अॅड. अतुल अडसरे, अॅड. योगेश थंबा, अॅड. सुनील कडुसकर, अॅड. प्रतिक जगताप, अॅड. तुकाराम पडवळे यांनी स्वयंसेवक म्हणून काम केले.
बोरमलनाथ दिंडीला अन्नदान
महापालिकेचे स्विकृत सदस्य सुनील कदम यांच्या वतीने बोरमलबाथ महाराज प्रासादिक दिंडी मुळशीकर यांना अन्नदान करण्यात आले. यासाठी भागवताचार्य अंजली सचिन गुरव, हभप सचिन महाराज गुरव यांचे सहकार्य लाभले. यावेळी उपमहापौर शैलजा मोरे, अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, आई बाबा प्रतिष्ठान व सिद्धार्थ नवरात्र मित्र महोत्सवाचे अध्यक्ष सुनील कदम, स्विकृत सदस्य दिनेश यादव आदी उपस्थित होते. अजित शेट्टी, रईज शेख, योगेश पटांगळे, स्वप्नील मवाळ, ममनून शेख, राम सूर्यवंशी, मोहन धुमाळ, अनिकेत आसवले, मेघराज कलबेकर, रोहित सूर्यवंशी, अमित ठाकुर, नरेंद्र राजपूत आदींनी संयोजन केले.
मोफत आरोग्य तपासणी
भक्ती शक्ती निगडी येथे संस्कार प्रतिष्ठान आणि टाटा व्हॉलेंटिअरिंग टाटा मोटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिरचे आयोजन केले. याचे उद्घाटन टाटा मोटर्सचे समाज विकास प्रमुख अचिंत्य सिंग व मयुरेश कुलकर्णी यांनी केले. सकाळी 10 ते रात्री आठ पर्यंत 2245 वारकर्यांची तपासणी करुन औषधांचे वाटप केले. तपासणीसाठी टाटा मोटर्सचे डॉ. शरद जगमवार डॉ. अरविंद वाघचौरे डॉ मृणाल फोंडेकर डॉ. निखील राक्षे, डॉ. निरज पाटील, डॉ कोमल कदम, डॉ प्रिया नायर, डॉ. माने यांनी केली. औषधांसाठी लक्ष्मी मेडिकल चिंचवड सप्तश्रुंगी मेडिकल काळेवाडी पाटील मेडिकल बिजलीनगर शिवम मेडिकल वाल्हेकरवाडी शुश्रुत आयुर्वेद चिंचवड स्टेशन यांनी मदत केली. 700 वारक-यांच्या हातापायांची मसाज करण्यात आली. 130 स्वयंसेवक विशेष पोलीस अधिकारी म्हणून देहू ते पिंपरी असे दोन दिवस भर पावसात निगडी, पिंपरी आणि चिंचवड पोलीस स्टेशनच्या हद्दीत बंदोबस्ताला व वाहतूक सुरळीत पार पाडण्यासाठी मदत करीत होते.
विश्व हिंदू परिषदेतर्फे रुग्णवाहिका
विश्वहिंदू परिषदेतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज आषाढी वारीमध्ये गेली 29 वर्ष पुणे ते पंढरपूर वारकर्यांच्या तब्बेतीची काळजी घेण्यासाठी रुग्णवाहिका असतात. यावर्षी पासून संत तुकाराम महाराजांच्या दिंडी सोबत निगडीपासून रुग्णवाहिकेची सोय करण्यात आली आहे. रूग्णवाहिकेचे उद्घाटन कल्याण सहकारी बँक चिंचवडचे मॅनेजर पाटील , विश्व हिंदू परिषद शहराध्यक्ष शरद इनामदार, डॉ. बी. के. झा, जयंत कड, ययाती केळे, डॉ. पोतनीस, डॉ.लबडे, डॉ. प्रतिभा लबडे, विजया रोडे यांनी रुग्णांना सेवा दिली.
फिनोलेक्स पाईप्सतर्फे पिशव्या, टोप्या
दिघी येथे फिनोलेक्स पाईप्सच्या वतीने 15 हजार हरिपाठ, 22 हजार पिशव्या व सहा हजार टोप्यांचे वाटप केले. तर मुकुल माधव फाउंडेशनच्या वतीने ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या सहकार्याने दिघीतील मुख्य चौकात आरोग्य तपासणी शिबिर घेतले. त्यामध्ये प्राथमिक उपचारांबरोबरच किरकोळ स्वरूपाचे आजार, अंगदुखी, पोटदुखी, ताप, डोकेदुखी, जखमांवरची मलमपट्टी, खोकला, अपचन, अशक्तपणा, अॅलर्जी, उष्माविकार, डीहायड्रेशन, डोळ्यांचे आणि कानांचे विकार आदींवर औषधोपचार करण्यात आले.