आमदार दत्तात्रय भरणे यांचा नागरी सत्कार

0

इंदापूर : इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी वरकुटे ते गंगावळण या 13 कि.मी. रस्त्याच्या दुरूस्तीसाठी चालु अर्थसंकल्पात चार कोटी 22 लाख रूपये निधी मंजुर केल्याने आमदार दत्तात्रय भरणे यांचा नागरी सत्कार वरकुटे ते गंगावळण पंचक्रोशितील सर्व ग्रामस्थांच्या वतीने भरणेवाडी येथिल आमदार भरणे यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी इंदापूर तालुकाध्यक्ष महारूद्र पाटील व समस्त ग्रामस्थ यांचे हस्ते करण्यात आला.

वरकुटे ते गंगावळण रस्त्याची दुरूस्ती झाल्याने गंगावळण या पर्यटण स्थळाकडे राज्यातील व देश विदेशातील हौशी पर्यटकांचा ओघ वाढून पर्यटकांणा चांगला रस्ता मिळाल्याने स्थानिकांनाही त्याचा मोठा फायदा होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष महारूद्र पाटील यांनी आमचे प्रतीनिधीशी बोलताना दिली.पाटील यांनी पुढे बोलताना सांगीतले की सत्काराच्या वेळी इंदापूर तालुक्यातील वरकुटे बु., अगोती, कळाशी, गंगावळण व आजुबाजुच्या वाड्यावस्त्यावरील सर्व नागरीक, ग्रामस्थ उपस्थित होते. यामधे तुकाराम गोलांडे, मनोहर दुधे, किसनराव जावळे,रविंद्र देवकर,सदा करे,पप्पु घोडके,काका चव्हाण,मारूती भोई,युवराज पवार,आनिल जगताप,दत्तात्रय रेडके, इत्यादी प्रमुख उपस्थित होते.