जिल्हाधिकाऱ्यांना आ. शिरीषकुमार नाईक यांचे पत्र
नवापूर। विधानसभेच्या नवापूर मतदार संघात कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाला आवश्यक साधन सामग्री खरेदी करून मिळावी, असे पत्र जिल्हाधिकारी यांना आमदार शिरीषकुमार नाईक यांनी दिले. यासाठी आमदार निधीतून मिळणाऱ्या ५० लाखाचा खर्च करावा.
देशात कोरोना विषाणूचा दिवसेंदिवस प्रादूर्भाव वाढत आहे. राज्यातील स्थिती पाहता मुख्यमंत्री यांनी दिलेल्या अधिकारानुसार आमदार निधीमधून ५० लाखाचे वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य खरेदीसाठी अनुमती दिली आहे. त्याअनुषंगाने नवापूर विधानसभा मतदार संघाचे काँग्रेस पक्षाचे आमदार शिरीषकुमार सुरुपसिंग नाईक यांनी आपल्या आमदार निधीमधून ५० लाखाचे वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य सार्वजनिक आरोग्य विभाग यांना देणार आहे
राज्यात कोविड -१९ विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्ग रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी महाराष्ट्र covid-१९ उपाययोजना नियम २०२० प्रमाणे तातडीच्या उपाय योजना निश्चित केले आहेत. त्या अनुषंगाने विषाणूविरुद्ध जिल्हा पातळीवर करण्यात येत असलेल्या कार्याला बळ देण्यासाठी विशेष बाब म्हणून आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत प्रतिबंध उपाय करण्यासाठी पन्नास लाख रुपयांचा निधी खर्च करण्यासाठी अनुमती आमदार शिरीषकुमार यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
जिल्हा नियोजन व विकास समितीचे सचिव तथा जिल्हाधिकारी यांना आमदार शिरीषकुमार नाईक यांनी आवश्यक आरोग्य यंत्र सामुग्रीची मागणी केली आहे.
शंभर इन्फ्रारेड थर्मल स्कॅनर, मशीन पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंटच्या एक हजार किटस, दोन व्हेेंटिलेटर, कोरोना टेस्टिंगच्या ५० किटस, फेस मास्क थ्री लेअर ग्लोव्हज १० हजार नग, सॅनिटायजर पाच हजार नग. असे पन्नास लाखाचे साहित्य खरेदी करून नवापूर तालुका आरोग्य विभागात तात्काळ देण्याची शिफारस केली आहे.