आमदार पाडवी यांच्याहस्ते पुलाचे लोकार्पण

0

लोणखेडा। शहादा तालुक्यातील म्हसावद, अनकवाडा आणि चिखली कानडी येथील पुलाचे लोकार्पण आमदार उदेसिंग पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले.आमदार पाडवी यांनी म्हसावद अनकवाडा हा पुल विशेष मागणी करुन शासनाकडून मंजूर करुन घेतला होता.सुमारे 90 लक्ष किमतीचा हा पुल पूर्ण झाल्याने सर्व सरपंच,उपसरपंच ,सर्व ग्रामपंचायत सदस्य व् तसेच भाजपाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितित या पुलाचे लोकर्पण करण्यात आले.

आमदार पाडवी यांचा पाठपुरावा
चिखली कानडीचा पुल सुद्धा आमदार पाडवी यांच्या पाठपुराव्यामुळे पुल मंजूर होऊन पूर्ण झाला. यावेळी डॉ.किशोर पाटील, दिनेश खंडेलवाल, मनोज चौधरी, संजय तुकाराम, अब्बास भाई, प्रकाश भाई, माधवभाई, रोहिदास भाई, चंद्रसिंग नाईक, डॉ. सुरेश नाईक, सुभाष भाई, मनीष चव्हाण, मधुकर चव्हाण, मोहन नाईक, लखान नाईक,संजय नाईक ,मधुकर नाईक, तिरुपति महाराज, खुशाल नाईक, आर.एम.पाटील व बाळा वळवी आदी उपस्थित होते.