आमदार प्रशांत ठाकूर देणार युवा पिढीच्या विकास, सक्षमीकरणावर भर

0

पनवेलकरांना आपण या वाढदिवशी काय भेट द्याल?
पनवेल महापालिकेच्या निर्मितीसाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा केला. त्याचे फलित आता पनवेलकर अनुभवत आहेत. याच वर्षी इथली महापालिका अस्तित्त्वात आली, तिच्या निवडणुकाही झाल्या. जनतेने आमच्यावर विश्वास टाकला व या महापालिकेत भाजपाला नेतृत्त्वाची संधी दिली. आता आम्ही कामाला सुरुवात केलीय आणि अगदी थोड्या दिवसात इथे होत असलेला प्रशासनातील बदल, विकासकामांचा धडाका जनता अनुभवत आहे. इथले तलाव आम्ही स्वच्छ केलेहेत; आता त्यात उमललेल्या कमळाचा सुगंध पनवेलकर अनुभवताहेत. ही तर सुरुवात आहे. आम्ही तातडीने सर्व शासकीय यंत्रणांचा समन्वय साधला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जातीने लक्ष घातले आणि पनवेल विमानातळाचा गेली अनेक वर्षे लटकून राहिलेला प्रश्न झटक्यात मार्गी लागला. आता पनवेलच्या विकासाचेही विमान उडू लागलेय.

आपल्या वाढदिवशी नेमके काय कार्यक्रम आयोजित केलेहेत?
मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानुसार, खरेतर त्याही पूर्वीपासून आम्ही सारेच कधीही कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा करतो. ज्येष्ठांचा सत्कार, गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान आणि गोरगरीब गरजूंना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यावर आमचा भर असतो. दरवर्षीप्रमाणे, रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्यावतीने यंदाही आरोग्य महाशिबिर होत आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय जन्मशताब्दी वर्षानिमित्त यंदा पुण्यातील साधू वासवानी मिशनतर्फे मोफत कृत्रिम जयपूर फूट (हात व पाय) बसवून दिले जाणार आहेत. रविवारी खांदा कॉलनीतील सीकेटी महाविद्यालयात होत असलेल्या या महाशिबिराचा लाभ परिसरातील हजारो गरजूंना होणार आहे.

वाढदिवशी आपण पनवेलकरांना काही संदेश देऊ इच्छिता का?
हो, नक्कीच! भेटवस्तू, पुष्पगुच्छ आणि हितचिंतकांच्या शुभेच्छा असा गदारोळ कृपया नको, हे मी जनतेला व माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही सांगीन. कोणत्याही प्रकारची जाहिरातबाजी, होर्डिंग्ज, बॅनर्स लावण्यात येऊ नयेत, त्याऐवजी मुख्यमंत्री शेतकरी सहायता निधीत योगदान द्यावे, असे माझे कार्यकर्ते व हितचिंतकांना आवाहन आहे. अभिष्टचिंतनासाठी पुष्प गुच्छ, हार–तुरे यावर खर्च न करता तो निधी मुख्यमंत्र्यांनी शेतकरीवर्गासाठी जी ऐतिहासिक कर्जमाफी जाहीर केली आहे, त्या कर्जमाफीसाठी ‘मुख्यमंत्री शेतकरी सहायता निधीस (सीएम फार्मर्स रिलीफ फंड) द्यावा. यासाठी शासनाचे स्वतंत्र खाते, क्रमांक 36977044087, आयएफएससी कोड क्रमांक SBIN0000300, मुंबई शाखा या नावाने उघडले आहे. त्या खात्यात धनादेश, डिमांड ड्राफ्ट किंवा रोखीने योगदान द्यावे.

आपले कार्यकर्ते, परिचित थेट आपल्याला गाठतात, ते ठीक आहे; पण सामान्य नागरिकांनी समस्या आल्यास काय करावे?
पनवेलकर जनतेच्या मदतीसाठी व समस्या सोडविण्यासाठी आम्ही विशेष टीमच तयार केली आहे. सिडको संबंधित कार्य असेल तर वायटी देशमुख, रवी णाआईईख़, भास्कर शेट्टी, उदीत नाईक, किशोर चौतमाल आहेत. शैकणिक अडचणीबाबत भालचंद्र घरत, प्रतीक्षा घाडगे, रोहिणी मोरे मदत करतात. चारुशीला घरत व जयंत पागडे यांना संपर्क केल्यास ते नक्की मदत करतात. शिवाय समाधान न झाल्यास मी केव्हाही उपलब्ध आहेच. 9833938716, 9322868140, 9320330303 हे मदतीचे व अडचणीच्या काळात भाजपा व आमदार प्रशांत ठाकूर मदतीला असल्याचे क्रमांक पनवेलकरांनी नोंदवून घ्यावेत. जनतेने आवाज द्यावा, आम्ही हजार आहोत.

आपण युवकांचे आमदार म्हणून ओळखले जातात. युवा क्षेत्राविषयी आपले काही ध्येय-धोरण सांगाल का?
युवक म्हणजे देशाच्या विकासाच्या साक्षात प्रतिकृती असतात. देशाची तब्बल ५० कोटी एवढी युवा लोकसंख्या ही देशाची मालमत्ता आहे. म्हणूनच युवक विकासाला मोठी चालना देण्याची गरज लक्षात घेऊन युवा पिढीचा विकास, सक्षमीकरण व प्रशिक्षणावर केंद्रीभूत विशेष कर्यक्रम राबवण्याचे मी ठरवले आहे.

आरोग्यसुविधांबाबत पनवेलकरांना आपल्याकडून अपेक्षा आहेत. त्याबाबत काही?
पनवेल परिसरातील जनतेच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक आरोग्याच्या समस्या निराकरणासाठी विविध उपाय योजना करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. विविध आजारांवर मात करण्यासाठी सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा देण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन.

शिक्षणाविषयी काही कार्यक्रम?
शास्त्रशुद्ध स्वरूपाचा दर्जात्मक स्तर, व्यवस्थापन कौशल्ये व मानवी मूल्ये यांच्या सहाय्याने अत्यंत अवघड अशा आधुनिक जगातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सुसज्ज युवकांना घडवणे, हे ध्येय आहे. असे शिक्षण पनवेल परिसरात उपलब्ध व्हावे असा आमचा निरंतर प्रयत्न आहे.

क्रीडा आणि मनोरंजन यासाठी आपण काही करताय का?
क्रीडाप्रकार किंवा खेळ हे युवकांशी निगडीत आणखी एक महत्वपूर्ण क्षेत्र आहे. म्हणूनच खेळांच्या सुविधांमध्ये सुधारणा घडवून ते समाजाच्या प्रत्येक स्तरासाठी सुसाध्य बनवण्यासाठी मी आवश्यक पावले उचलत आहे .

महिला कल्याणासाठी आपल्या काही योजना आहेत काय?
संघटीकरण, समन्वय आणि शिक्षणाची गरज, स्वावलंबन व विकास याबाबत महिलांमध्ये जागृती निर्माण करणे, यावर माझा भर आहे. महिलांमध्ये सामजिक न्याय, आर्थिक सबलीकरण व कायदेशीर अधिकारांबाबत जागृती निर्माण करणे; विशेषत: ग्रामीण भागात महिलांमधील नेतृत्व व निर्णय क्षमता आदी गुण ओळखणे आणि हे गुण वाढवून त्यांचे सशक्तीकरण करणे, यावर आमचा भर आहे. चरितार्थासाठी पर्याय म्हणून त्यांच्या व्यावसायिक कौशल्यांना प्रोत्साहन देण्याचा आमचा निरंतर प्रयत्न असतो. रोजगार निर्मिताचे मार्ग तसेच लघु उद्योग सुरु करण्यासाठी संभाव्य महिला व्यावसायिकांना आवश्यक प्रशिक्षण देण्याच्या सुविधा आम्ही उपलब्ध करून देत आहोत. महिलांना आरोग्य, स्वच्छता व पोषण या संदर्भातील माहिती देणे व आवश्यक प्रशिक्षण देणारे कार्यक्रम आगामी काळात राबविण्याची योजना आहे.

राजेंद्र पाटील,
जनशक्ति प्रतिनिधी, पनवेल
9967285618