आमदार भोळेंच्या उपस्थितीत उन्हाळी खो-खो शिबिराचा समारोप

0

जळगाव । श्री गणपतराव पोळ क्रीडा विकास प्रबोधिनी व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय खो-खो प्रशिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यामाने व जिल्हा क्रीडा संघाच्या सहकार्यांने 11वे वासंतिक खो-खो प्रशिक्षण शिबिराचा समारोप आमदार सुरेश भोळे, रजनीकांत कोठारी यांच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, श्री. तरडे, खो-खो मार्गदर्शक गुरूदत्त चव्हाण, प्रबोधिनीचे अनंता सैंदाणे आदी उपस्थित होते. सहभागी सर्व खेळाडूंना शासनातर्फे गौरविण्यात आले.