आमदार भोळेंच्या मार्गदर्शनात २५ कोटींची कामे मार्गस्थ

0

जळगाव । २५ कोटी निधीच्या खर्चाबाबत आमदार सुरेश भोळे यांच्याशी सविस्तर चर्चा करुन निधीतुन गटारीचे बांधकाम करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहीती महापौर ललित कोल्हे यांनी दिली आहे. या निधीतून शहरातील कोल्हे गोंडावुन, जुने जळगाव भागातील तुटलेला पुल बांधण्यात येणार आहे. अमृत योजनेच्या कामांना सुरु होण्याला अवधी असल्याने, ज्या-ज्या माध्यामातून निधी उपलब्ध होईल त्या प्रकारे शहरातील विकास कामे करण्यात येतील असे महापौर यांनी सागितले. दरम्यान, २५ कोटींच्या निधीखर्चांबाबत आमदार सुरेश भोळे यांनी बैठक बोलविली आहे. यानुसार बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत आमदार चंदुलाल पटेल, महापौर ललित कोल्हे, खाविआ नेते रमेश जैन, माजी महापौर नितीन लढ्ढा, महापालिकेतील सर्वपक्षीय गटनेते, जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोरराजे निंबाळकर उपस्थित राहणार आहेत.