आमदार भोळे यांच्याहस्ते राष्ट्रीय खो-खो खेळाडूंचा सत्कार

0

जळगाव । श्री गणपतराव पोळ क्रीडा विकास प्रबोधिनी संस्थेतर्फे वार्षिक पारितोषिक वितरण करण्यात आले आहे. याप्रसंगी आमदार सुरेश भोळे, जिल्हा क्रीडा संघाचे अध्यक्ष रजनीकांत कोठारी, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील उपस्थित होते. सन 2016-17 साली खो-खो खेळात राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघातून यशस्वीपणे खेळलेले प्रबोधिनीच्या खेळाडूंचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यात तेजस्विनी जाधव, तेजस्विनी बोरसे या खेळाडूंचा आई वडीलांसह सत्कार करण्यात आला. याप्रसंगी खो-खो मार्गदर्शक गुरूदत्त चव्हाण, श्री. तिडके, अनंता सैंदाणे यांची उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी राहुल पोळ, अनंता सैंदाणे, नामदेव सोनवणे, देविदास महाजन, दत्तात्रय महाजन, विशाल पाटील, दिलीप चौधरी, चंद्रकांत महाजन, बापू सावदेकर, प्रशांत सोनवणे, प्राची मुजुमदार, अदिती पाटील, अनिल कुळकर्णी, हर्षल बेडीस्कर, तुषार सोनवणे आदींनी कामकाज पाहिले.