जळगाव-माजी महसूलमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठनेते आमदार एकनाथराव खडसे यांचा मुख्य व्यवसाय शेती असतांना त्यांच्याकडे प्रचंड प्रमाणात संपत्ती कशी आली याची चौकशी करा असे पत्र मुंबई उच्च न्यायालयाला पाठविण्यात आले आहे. विशेष म्हणजे जळगावचेच भाजप आमदार सुरेश भोळे यांच्या लेटर हेडवरून ही मागणी करण्यात आली आहे. दरम्यान आमदार भोळे यांनी याबाबत खुलासा केला असून मी कोणतेही पत्र पाठविलेले नसून माझी आणि खडसे यांची बदनामी करण्याचे हे षड्यंत्र असल्याचे भोळे यांनी सांगितले आहे.
याबाबत आमदार भोळे यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे सदरील बाबीची तक्रार केली आहे. दरम्यान या प्रकारावरून राजकीय खळबळ उडाली आहे. सर्वत्र चर्चा सुरु आहे.