Chalisgaon MLA Mangesh Chavan’s Facebook account was hacked to the tune of 70,000 चाळीसगाव : शहरातील भाजप आमदार मंगेश चव्हाण यांचे फेसबुक अज्ञाताने हॅक केल्याची बाब समोर आली असून या माध्यमातून तक्रारदाराचा खात्याशी असलेल्या क्रेडीट कार्ड क्रमांकाद्वारे 70 हजारांची फसवणूकदेखील झाल्याची बाब समोर आल्याने सायबर पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. आमदारांचे फेसबुक अकाउंट हॅक झाल्याने जिल्ह्यात खळबह उडाली आहे.
सायबर पोलिसात गुन्हा
गोपाल शिवाजी म्हस्के (मूळ रा.खडकदेवळा, ह.मु.रा.टाकळी प्र.चा., ता. चाळीसगाव) यांच्या तक्रारीनुसार, आमदार मंगेश चव्हाण यांचे सोशल मिडीयावरील फेसबुक अकाऊंट व फेसबुक पेज 26 ते 28 सप्टेंबर 2022 दरम्यान अज्ञात व्यक्तीने हॅक केले. त्यानंतर प्रोफाईल फोटो बदलून त्यावर काळा बुरखा (कपडा लपटलेला) चेहरा व हातात चाकु घेतलेले व्यक्तीचा धमकी देणारा तसेच बदनामीकारक फोटो अपलोड केला. फेसबुक अकाऊंटवरील पोस्ट देखील डिलीट केल्यात शिवाय फेसबुक पेजला लिंक असलेल्या तक्रारदार गोपाल म्हस्के यांच्या क्रेडीट कार्डमधून ओ.टी.पी. न घेता 70 हजार 800 रुपये काढून आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहेत.