आमदार महेश लांडगे यांचा सोमवारी जंगी अभिष्टचिंतन सोहळा

0

पिंपरी-चिंचवड : भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी (दि. 27) भोसरीतील गाव जत्रा मैदानावर अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण दिवस भोसरी मतदार संघात व खेड, मंचर, जुन्नर तालुक्यातही अनेक जंगी कार्यक्रमाचे आयोजन वाढदिवसा निमीत्त करण्यात आले आहे. दरम्यान, कोणीही पुष्पगुच्छ किंवा पुष्पहार घेवून येवू नये, असे आवाहन, आमदार महेश लांडगे मित्रमंडळाने केले आहे.

पहाटे आळंदी येथील संत ज्ञानेश्‍वर महाराज मंदीर व देहू येथील संत तुकाराम महाराज मंदीरात अभिषेक कार्यक्रमापासून दिवसाची सुरवात केली जाणार आहे. त्यानंतर मतदारसंघातीस समाविष्ट गावांच्या ग्रामदैवतांचे दर्शन घेतील. कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी आयोजीत केलेल्या कार्यक्रमास उपस्थिती लावून केक कापण्याचा कार्यक्रम साजरा केला जात आहे. वाढदिवस संपूर्ण भोसरीकर साजरा करत आहे. रात्रीपासूनच कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी पेढे वाटप केले जात असून फटाके वाजवुन आनंद व्यक्त केला जात आहे. तर गावजत्रा मैदानावर भव्य दिव्य व्यासपीठ उभा केले आहे. व्यासपीठावर जिल्हयातील अनेक राजकीय, सामाजिक व उदयोजक दिग्गजांची लांडगे यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थिती असणार आहे. यामध्ये शहर व जिल्ह्यातील नेते, पदाधिकारी, विविध संस्थांचे संस्थापक, अध्यक्ष, कार्यकर्ते यांचा समावेश असणार आहे. हा कार्यक्रम सायंकाळी सहा ते रात्री दहापर्यंत चालणार आहे.