चाळीसगावात सामाजीक संघटनांकडून निषेध; तहसीलदारांना दिले निवेदन
चाळीसगाव – भाजपचे आमदार राम कदम यांच्या महीला व मुलींबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याचा चाळीसगाव येथे आज दिनांक ६ रोजी विवीध संघटनांतर्फे निषेध करुन त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करुन निषेधाचे निवेदन नायब तहसिलदार नानासाहेब आगळे यांना देण्यात आले. भाजपाचे आमदार राम कदम यांनी ३ सप्टेंबर रोजी मुंबई येथील घाटकोपर येथे दहीहंडीच्या दिवशी जमलेल्या युवकांशी संवाद साधत असताना बेताल आणि वादग्रस्त वक्तव्य केले होते. आमदार पदावर असलेल्या व्यक्तीने असे बोलणे म्हणजे समस्त नारी जातीचा अपमान आहे याचा सामाजीक संघटनांनी जाहीर निषेध केला असुन ६ रोजी तहसिल कार्यालयासमोर आमदार राम कदम यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात येवुन त्यांनी याबद्दल जाहीर माफी मागावी अशी मागणी करण्यात आली तशा आशयाचे निवेदन नायब तहसिलदार नानासाहेब आगळे यांना देण्यात आले.
निवेदनावर रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, नगरसेविका विजयाताई पवार, सविता कुमावत, प्रगत संस्थेचे अध्यक्ष खुशाल पाटील, सह्याद्री प्रतिष्ठानचे दिलीप घोरपडे, पप्पुदादा गुंजाळ प्रतिष्ठान अध्यक्ष राहुल पाटील, मकरनी सेनेचे तालुकाध्यक्ष वीरेंद्रसिंग (टोनु )राजपुत, स्वयंभू प्रतिष्ठान अध्यक्ष शांताराम पाटील, रयत सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष अल्लाउद्दीन भाईसाहब शेख, रयत सेनेचे प्रदेश समन्वयक पी.एन.पाटील, रयत सेनेचे शहराध्यक्ष मॉंटी शेख, नगरसेवक दिपक पाटील, संजय ठाकरे, भाऊसाहेब पाटील, रोहन पाटील, प्रदीप मराठे, रविंद्र पाटील, जितेंद्र गायकवाड, गौरव पाटील, परेश शिंदे, ऋषीकेश साळुंखे, उमेश पवार, प्रवीण देशमुख, अभिमन्यू महाजन, मुंतजीम शेख, मोहसिन हसनखान, सुनिल निबाळकर, छोटु अहिरे, राहुल पाटील, राजेश पाटील, विरसिंग जाधव, खुशाल बिडे, विलास मराठे, विजय पाटील, दिनकर कडलग, विकास बागड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
– फोटो आहे