सांगवी – पिंपळे सौदागर येथील गोविंद यशदा चौक आणि जगताप डेअरी येथील पार्क स्ट्रीट सोसायटी समोरील बीआरटीएस येथे होणार्या सब वे चे भूमीपूजन चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते गुरूवारी करण्यात आले. गोविंद यशदा चौक येथील सब वे चे काम पूर्ण झाल्यानंतर सदर चौक पूर्णपणे सिग्नल मुक्त होणार आहे. जेणेकरून याठिकाणी होणारी वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे. तसेच गोविंद यशदा चौक येथील सब वे कामासाठी आवश्यक निधी दोन्ही भाजप नगरसेवकांनी स्थायी समितीमधून मंजूर करून घेतला आहे.
यावेळी पवना सहकारी बँकचे व्हा. चेअरमन जयनाथ काटे, नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेविका निर्मला कुटे, बीआरटीएसचे कार्यकारी अभियंता श्रीकांत सवणे, उपअभियंता संदेश खडतरे, अभिजित दहाडे, विद्युत विभागाचे कावळे, यशदा रियल्टी ग्रुपचे चेअरमन वसंत काटे, संजय भिसे, काँट्रॅक्टर्स, परिसरातील विविध सोसायटी मधील पदाधिकारी आदी उपस्थित होते. पिंपळे सौदागर हे एक स्मार्ट सिटीच्या दिशेने अग्रेसर होत आहे आणि परिसरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता परिसरातील वाहतूक कोंडीचे प्रश्न सोडवण्यावर नगरसेवक शत्रुघ्न काटे व नगरसेविका निर्मला कुटे हे प्रामुख्याने विशेष लक्ष देत आहेत.
* परिसर वाहतूक कोंडीमुक्तीसाठी प्रयत्न
विविध विकासकामांच्या माध्यमातून सदर प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मग ते आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रेरणेने साकारले जाणारे साई चौक उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर असो किंवा ‘वाय’ जंक्शन येथील ग्रेड सेपरेटर किंवा कोकणे चौक ते काळेवाडी फाटापर्यंत असणार्या एचसीएमटीआर 30 मीटर रस्त्याचे काम किंवा प्रभागातील मुख्य चौक उदा . सुदर्शन नगर चौक, गोविंद यशदा चौक, कोकणे चौक, शिवार चौक येथे सब वे /ग्रेड सेपरेटर चे नियोजन इत्यादी सर्व विकास कामाच्या माध्यमातून पिंपळे सौदागर परिसर वाहतूक कोंडीतून मुक्त करण्याचा प्रयत्न दोन्ही भाजप नगरसेवक करीत आहेत.