चंद्रभागा जगताप यांचे वृद्धापकाळाने निधन
सांगवी : येथील हभप चंद्रभागा पांडुरंग जगताप (वय 75) यांचे गुरुवारी (दि 30) सकाळी दहाच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे चिंचवडचे आमदार व भाजपा शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, माजी नगरसेवक शंकर जगताप, उद्योजक विजय जगताप असे तीन मुलगे, तसेच 4 मुली, सुना ,नातवंडे असा परिवार आहे.
पिंपळे गुरव परिसरात ‘नानी’ या नावाने सर्वपरिचित असलेल्या चंद्रभागा जगताप या धार्मिक वृत्तीच्या व मनमिळावू स्वभावाच्या होत्या. गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास पार्थिवावर पिंपळे गुरव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आमदार बाळा भेगडे, गौतम चाबुकस्वार, माधुरी मिसाळ, माजी आमदार विलास लांडे, महापौर नितीन काळजे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, स्थायी समिती सभापती सीमा सावळे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महापालिकेतील विरोधी पक्षनेते योगेश बहल, जेष्ठ उद्योजक नानासाहेब गायकवाड, पुणे मनपाचे दत्तात्रय गायकवाड यांच्यासह आजी माजी नगरसेवक, अधिकारी तसेच सर्वच क्षेत्रातील मान्यवर आणि पंचक्रोशीतील हजारो नागरिक उपस्थित होते.