महिला व बालकल्याण समितीचा उपक्रम
भोसरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीमार्फत शहरातील शाळेतील विद्यार्थ्यांना स्वच्छता किटचे वाटप करण्यात येत आहे. भोसरी येथील पालिकेच्या सावित्रीबाई फुले व लांडगेवस्ती येथील बालकमंदीरमधील विद्यार्थ्यांना आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते स्वच्छता आणि आरोग्य किटचे वाटप करण्यात आले. यावेळी नगरसेविका सारिका लांडगे, उद्योजक नवाब शेख, नवनाथ लांडगे, सतिश लांडगे, मारुती लांडगे, संतोष लांडगे, कृष्णा लांडगे, सुभाष माळी, सुधीर झपके, संतोष प्रजापती, अंगनवाडी समन्वयक साळी मॅडम, शिक्षिका आशा माळी, अंजना सोनवणे आदी उपस्थित होते.
महिला स्वावलंबी होतील
यावेळी बोलताना आमदार महेश लांडगे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड महापालिका महिला व शाळेतील मुलांसाठी विविध योजना राबवित आहे. या योजनांमुळे महिला स्वालंबी होऊ शकतात. महिलांनी या योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा. शाळेतील मुलांच्या आरोग्याची काळजी पालिका घेते. मुलांचे आरोग्य सदृढ राहणे गरजेचे आहे. त्यांना स्वच्छतेचे महत्व बालपणापासूनच समजले पाहिजे. यासाठी पालिका मोठ्या प्रमाणात पुढाकार घेऊन विविध उपक्रम सातत्याने राबवित आहे. पुढील पिढीचे आरोग्य सदृढ व सक्षम राहण्यासाठी महापालिकेतर्फे स्वच्छता व आरोग्य किटचे वाटप करण्यात आले आहे.