पिंपरी : पद्मा प्रतिष्ठान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समिती यांच्यावतीने ‘पद्मा संघर्ष राज्यस्तरीय पुरस्कार’ माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना, तर ‘पद्मा युवा संघर्ष राज्यस्तरीय पुरस्कार’ भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना जाहीर झाला आहे. पुण्यातील गणेश कला क्रीडामंच येथे हा पुरस्कार सोहळा रविवारी (दि. 9) होणार आहे. या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून ऑल इंडिया अॅन्टी टेररिस्ट फ्रंटचे अध्यक्ष मनिंदरसिंग बिट्टा, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार श्रीरंग बारणे व पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक उपस्थित राहणार आहेत. ज्या व्यक्तींनी संघर्षातून आपले आयुष्य घडवले, अशा व्यक्तिंना पद्मा प्रतिष्ठान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीतर्फे हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.