अमळनेर (प्रतिनिधी): कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमदार स्मिताताई वाघ यांनी शनिवारी प्रांताधिकारी, तहसीलदार आणि आरोग्य अधिकाऱ्यांची भेट घेऊन संपूर्ण शहासह तालुक्यातील आढावा घेतला. तसेच आयएमआय संघटना आणि खासगी डॉक्टरांच्या माध्यमातून सानेगुरूजी शाळेत सुरू करण्यात आलेल्या रुग्णतपासणी कक्षाला भेट देऊन माहिती घेऊन अधिकच्या किट उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत आणि त्यांचे विशेष आभार ही मानले. तसेच आपली अस्मिता पणाला लावून सर्वांच्या सोबतीने कोरोनाशी सुरू असेलली लढाई आपण निश्चितच जिंकू असा विश्वास त्यांनी सर्वांना दिला.
या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रफुल्ल पाटील, तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, शहर अध्यक्ष उमेश वाल्हे, माजी शहर अध्यक्ष शितल देशमुख, सरचिटणीस राकेश पाटील, राजेश वाघ, निवास मोरे, किरण वारुळे, राहुल चौधरी आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.