आमदार शिरीषकुमार नाईक कोरोनासाठी एका महिन्याचे वेतन देणार

0

नवापूर: “कोरोना विषाणू” संदर्भात मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये एक महिन्याचा पगार देणार असल्याचे नवापूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे आमदार शिरिषकुमार नाईक यांनी सांगितले.
आ.नाईक म्हणाले की नवापूर तालुक्‍यातील जनतेला संचारबंदी काळात कुठल्याही अडचणीला सामोरे जावे लागू नये. जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासू नये यासाठी प्रयत्नशील आहोत. वेळोवेळी अधिकारी व प्रशासनाला सुचना. देखील देत आहोत. जनतेने शासन व प्रशासनाच्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे असे मी आवाहन केले आहे. कोरोना या विषाणूने जगात थैमान घातले असून यावर मात करण्यासाठी सर्व प्रयत्न करीत आहे अशा या संकट काळात मजुर व गरिबांचा उपासमार होऊ नये म्हणुन नवापूर परिसरातील व्यापारी ,दानशूर व्यक्ती ,सामाजिक कार्यकर्ते ,युवा वर्ग पुढे येऊन गरीब लोकांना अन्नधान्य व जीवनावश्क साहित्य वाटप करून मदतीचा हात देत आहेत ही एक अभिमानाची गोष्ट आहे. वेळोवेळी नैसर्गिक आपत्ती आली त्यावेळेस नवापूर भागातुन असे प्रयत्न झालेले आहेत व आलेल्या संकटावर मात केली आहे.लोकांचा १०० टक्के सहकार्यानेच आपण कोरोनावर मात करु असा मला विश्वास आहे असं त्यांनी सांगितले.