नगरसेवक पिंटू कोठारींसह भाजपा पदाधिकार्यांनी केला सत्कार
भुसावळ : भुसावळचे लोकप्रिय आमदार संजय सावकारे यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी सकाळपासून त्यांच्या चाहत्यांसह मित्र परीवार भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार केला. सावकारे यांचे खंदे समर्थक व विश्वासू कार्यकर्ते असलेल्या नगरसेवक पिंटू कोठारी यांनी भला मोठा बुके देऊन सायंकाळी त्यांचा सत्कार करून त्यांचे आशीर्वाद घेतले. सायंकाळी भुसावळातील भाजपा पदाधिकार्यांनीही सावकारे यांचा सत्कार केला.
सोमवारी सोनिच्छावाडी प्राथमिक विद्यामंदिरात तीन गोदरेज कपाट देण्यात आले तर मुसाळतांडा येथे 32 जणांना स्वेटर वाटपाचा कार्यक्रम झाला तसेच साकरी प्राथमिक विद्यामंदिरातील तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेतील 15 विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यात आले. कंत्राटी कामगार संघटनेतर्फे दीपनगरच्या शारदा माध्यमिक विद्यामंदिरात 400 विद्यार्थ्यांना स्वेटर तसेच संत गाडगे महाराज विद्यार्थी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना सावकारे परीवारातर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासह जेवण देण्यात आले.