वरणगावात टँकरचे लोकार्पण : भुसावळ शहर व तालुक्यात विविध कार्यक्रम
भुसावळ : भुसावळचे लोकप्रिय आमदार संजय सावकारे यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवार, 11 डिसेंबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. बुधवारी सकाळी नऊ वाजता साकेगांव येथे आमदारांचा वाढदिवस साजरा करण्यात आला तर सकाळी साडेनऊ वाजता प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे रजनी सावकारे यांच्या नेतृत्वात भगीरथी प्राथमिक विद्यामंदिरात सदिच्छा भेट व शालेय शैक्षणिक साहित्यासह विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला
सकाळी 10 वाजता खडका येथे श्रीमद् भागवत सप्ताहात आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते आरती व पूजन कार्यक्रम झाला. सकाळी 10.30 वाजता नगरपालिका शाळा क्रमांक दोनमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपासह सकाळी 11 वाजता भुसावळ नगरपालिका दवाखान्यात भव्य रक्तदान शिबिराला आमदारांनी हजेरी दिली. जामनेर रोडवरील आमदारांच्या संपर्क कार्यालयाबाहेर सकाळी 11.30 वाजता भव्य नेत्र तपासणी शिबिर उत्साहात पार पडले.
वरणगावात टँकरचे लोकार्पण
बुधवारी वरणगाव येथे आमदार संजय सावकारे यांच्यातर्फे पाण्याच्या टँकरचा लोकार्पण सोहळा मोठ्या थाटात पार पडला. प्रसंगी नगरसेवक नितीन माळी, अरुणा इंगळे, अतुल झांबरे, प्रशांत पाटील, रोहिणी जावळे, इफ्तेखार मिर्झा, चंदू झोपे, नामदेव पहेलवान, सुपडू पहेलवान, प्रशांत निकम, विकास पाटील, नरू माळी, कौस्तुभ पाटील, सुनील बढे, मुजफ्फर शहा आदींची उपस्थिती होती. दरम्यान, बुधवारी रात्री आठ वाजता शहरातील बियाणी स्कुलमध्ये आमदारांचा लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत अभीष्टचिंतन सोहळा साजरा करण्यात आला.