आमदार सुरेश भोळे यांची भाजप जिल्हाध्यक्षपदी निवड

0

जळगाव: माजी खासदार हरिभाऊ जावळे यांच्या निधनाने भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्षपद रिक्त होते. दरम्यान जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांची जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी ही नियुक्ती केली असून तसे पत्र देण्यात आले आहे. आमदार सुरेश भोळे हे सलग दुसऱ्यांदा जळगाव शहरातून आमदार म्हणून निवडून आले आहे.