आमदार सोनवणेंची नगरपालिकेत भेट

0

यावल । आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी नगरपरिषदेस सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी नगराध्यक्षा सुरेखा कोळी, उपनगराध्यक्ष प्रा. मुकेश येवले, गटनेते युनुस शेठ, मनोहर सोनवणे, धिरज महाजन, डॉ. युवराज चौधरी, समीर भाई, दिलीप वाणी, शरद कोळी, गणेश महाजन, जाकीर भाई, अय्युब भाई, कडु पाटील, भरत कोळी, संतोष धोबी, गोपाल चौधरी, गोटु कोळी, सी.ओ. आढाव, मोरे, देवरे, शिवानंद कानडे आदी हजर होते.

शहराच्या विकासासाठी मदत करणार
स्वच्छ भारत अभियान पुरस्कार मिळाल्याबद्दल अध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी व सर्व कर्मचार्‍यांचे आमदारांनी अभिनंदन केले. तसेच शहराच्या विकासासाठी सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्‍वासनही आमदार सोनवणे यांनी यावेळी दिले.