आमदार स्मिताताई वाघ यांचा तरुणांशी संवाद

0

माय जॉब फेअरला दुसऱ्या दिवशीही तरुणांचा प्रतिसाद
जळगाव – सिध्दीविनायक समूहाचे चेअरमन कुंदन ढाके, खान्देश कॉलेज एज्यूकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विदयमाने केसीई अभियांत्रिकी महाविदयालयात आयोजित माय जॉब फेअरच्या दुसऱ्या दिवसाला विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने सुरुवात झाली. मान्यवरांच्या भेटी सुरु असून दुपारी १२ वाजेपर्यंत आमदार स्मिता वाघ, आमदार चंदूलाल पटेल आदींनी भेट दिल्या. यात आमदार स्मिता वाघ यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधुन या माय जॉब फेअर उपक्रमाचे कौतूक केले.

जॉब फेअरचे तरुणांकडून स्वागत
शनिवार १५ डिसेंबरपासून जळगावातील केसीई अभियांत्रिकी महाविद्यालया सुरु झालेल्या माय जॉब फेअर २०१८ या महारोजराग मेळाव्यात पहिल्याच दिवशी नोंदणीकृत २२०० विद्यार्थ्यांच्या विविध कंपन्यांनी मुलाखती घेतल्या. दुसऱ्या दिवशीही तरुणांचा प्रचंड प्रतिसाद लाभत असून रविवारी सकाळपासूनच तरुणांनी गर्दी केली आहे. दरम्यान, पुणे, मुंबईतील मोठमोठया कंपन्या जळगावात येवून मुलाखती घेत आहे ही आमच्यासाठी मोठी गोष्ट असून स्थानिक पातळीवर संधी उपलब्ध झाल्याने समाधानी आहोत अश्या प्रतिक्रीया तरुणांमधून येत आहे.

कोट–
“स्थानिक पातळीवर तरुणांना रोजगाराची उपलब्ध करुन देणार माय जॉब फेअर हा उपक्रम कौतूकास्पद आहे. घरातील एकाही व्यक्तीला रोजगार मिळाल्यास संपूर्ण कुटूंब स्थिर होते. मोठया आशेने आलेल्या तरुणांना या जॉब फेअरमधून उज्ज्वल भविष्य घडविण्याची सुवर्ण संधी आहे. जिल्हयातील तरुण हुशार असून केवळ सादरीकरणात मागे पडतात. याबाबतचा चांगला अनुभव व चांगली शिकवण या ठिकाणी त्यांना मिळणार असून त्याचा भविष्यात देखील त्यांना खूप फायदा होईल. आलेला प्रत्येक तरुण या ठिकाणावरुन रोजगार घेवूनच बाहेर पडेल, अशी अपेक्षा व्यक्‍त करते व सर्वांना शुभेच्छा.”
-आमदार स्मिताताई वाघ

“पुणे, मुंबईतील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील कंपन्या कुंदन ढाके यांच्यामुळे साक्षात मुलाखतीसाठी जळगावात आले आहे. तरुणांना ही मोठी संधी उपलब्ध करुन दिली आहे. यातून अनेकांना रोजगार मिळेल व अनेक कुटूंब स्थिरावतील.”
-आमदार चंदूलाल पटेल