आमदार हर्षवर्धन जाधवांना 1 वर्षाची शिक्षा

0

औरंगाबाद : तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा 5 जानेवारी 2011 रोजी वेरूळ लेणीचा दौरा होता.त्यावेळे मनसेचे आमदार व विद्यमान शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राडा घातला होता. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दोन गुन्ह्यात प्रत्येकी 1 वर्षाची शिक्षा व प्रत्येकी 5 हजार रूपायांचा दंड जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावण्यात आला आहे.त्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल पाच वर्षानंतर या प्रकरणाचा जिल्हा सत्र न्यायालयाने 6रोजी निकाल दिला.2011 मध्ये हे प्रकरण गाजले होते. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील आणि राज ठाकरे यांच्यात झालेल्या वादामुळे हे प्रकरण तब्बल महिनाभर चर्चेत होते. हर्षवर्धन जाधव यांना न्यायालयाने उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी एक महिन्याचा अवधी दिला असून तोपर्यंतचा जामीन देखील जाधव यांना देण्यात आला आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा 5 जानेवारी 2011 रोजी वेरुळ लेणीचा दौरा होता. या दौर्‍यादरम्यान त्यावेळेस मनसेमध्ये असलेले आमदार हर्षवर्धन जाधव हे मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी प्रयत्नशील होते. गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना मदत मिळावी यासाठी जाधव हे मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला. वेरूळकडे जाणार्‍या ताफ्यात गाडी घालण्याचा प्रयत्न केला. त्यांना अडवण्यासाठी पुढे आलेल्या सुर्यकांत कोकणे या पोलीस अधिकार्‍यावरही त्यांनी गाडी घालण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस पोलीस आणि आमदार जाधव यांच्यात जोरदार वाद झाला. या घटनेनंतर महिला पोलिसांचा विनयभंग, पोलीस कर्मचार्‍यांना मारहाण आणि शिवीगाळ केल्याची तक्रार पोलिसांनी केली होती.

त्यामुळे संतापलेल्या 50 ते 60 पोलिसांनी हर्षवर्धन यांना बेदम चोप दिला. इतकेच नाही तर त्यांना रत्नपूर पोलीस ठाण्यात नेऊन अमानुषपणे मारहाण केली होती. आमदारांना पोलिसांनी लाथा-बुक्क्या आणि काठ्यांनी मारलं होतं. पोलिसांच्या मारहाणीत हर्षवर्धन जाधव गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या सर्व प्रकाराचे पडसाद विधीमंडळात उमटले होते. तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील यांनी संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचं आश्वासन दिलं होतं.