आमलान गावात रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

0

नवापूर । नवापूर तालुक्यातील मौजे आमलान गावात आमदार निधी अंतर्गत रस्ता कामाचा शुभारंभ करण्यात आला. आमलान वसावेफळी ते स्मशानभूमी पर्यंत रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ जि.प अध्यक्षा रजनीताई नाईक यांचा हस्ते करण्यात आला. हा रस्ता संपूर्ण काँक्रिटीकरण असून 10 लाख रुपये खर्च आहे. पावसाळयाच्या काळात अंतविधीसाठी ग्रामस्थांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागत होता. ही अडचन लक्षात घेऊन जि. प. अध्यक्षा रजनीताई नाईक यांनी तात्काळ दखल घेऊन रस्ता काँक्रिटीकरणाचे काम सुरु केले.

यावेळी पं.स सभापती सविता गावीत, पं.स सदस्या किसु कोकणी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन दिपक नाईक, सरपंच राजेश गावीत, उपसरपंच मंगेश गावीत, सदस्य गणेश वसावे, ज्योती कोकणी, रुपाली वसावे, रिना वसावे, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, विस्तार अधिकारी किरण गावित, ग्रामसेवक दिपाली जाधव, बाबुराव कोकणी, नारायन कोकणी उपस्थित होते.