मुंबई : पहिल्यांदाच अमिताभ बच्चन आणि आमिर खान एकत्र स्क्रीन शेअर करत असलेला चित्रपट ‘ठग्स ऑफ हिन्दोस्थान’ दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होत आहे. या भूमिकेसाठी आमिर फार उत्साहित असल्याचे त्याने सांगितले. यामध्ये तो ‘फिरंगी मल्लाह’ नावाचे पात्र साकारणार आहे.
एका मुलाखतीदरम्यान, आमिरने सिनेमाविषयी काही किस्से शेअर केलेत. तो म्हणाला, मला नेहमीच माझ्या आवडीच्या कलाकारांसोबत काम करण्याची इच्छा होती. यापैकी एक म्हणजे अमिताभ बच्चन आणि श्रीदेवी. मला खूप दुःख आहे की, मी श्रीदेवी यांच्यासोबत काम करु शकलो नाही. मला कधी त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली नाही. अमिताभ बच्चन यांच्यासोबत काही खास क्षण घालविले आहे. ‘ठग्स ऑफ हिन्दोस्थान’च्या चित्रीकरणाआधी मी शाहरुखला भेटण्यास गेलो होतो. मी शाहरुखला विचारले की, काय मी अमिताभ यांच्या समोर सिगरेट पिऊ शकतो ? शाहरुखने उत्तर दिले, होय का नाही. ते खूप कुल व्यक्ती आहेत. तसेच आमिर पुढे म्हणाला, मी अमिताभ बच्चन यांच्यापासून मला खूप प्रेरणा मिळते.