आमिर खान ‘केबीसी’च्या हॉट सीटवर

0

मुंबई : महानायकचा लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘केबीसी’ अर्थात ‘कौन बनेगा करोडपती’या शोच्या दहाव्या पर्वाला सुरुवात झाली आहे. आतापर्यत या पर्वामध्ये अनेक स्पर्धकांनी सहभाग घेतला असून अभिनेता आमिर खानदेखील आता केबीसीमध्ये येणार आहे.

आमिर त्याच्या आगामी ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटाचं प्रमोशन करणार आहे. आमिरने त्याच्या ट्विटरवरुन केबीसीमध्ये झळकणार असल्याची माहिती दिली आहे. आमिर खान आणि अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून सध्या चित्रपटाची संपूर्ण टीम प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.