जळगाव। तालुक्यातील पाथरी येथून अल्पवयीन मुलीस आमिष दाखवून पळवून नेल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात सुरत येथील एका तरूणविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुळची सुरत येथील असलेली अल्पवयीन मुलगी ही तालुक्यातील पाथरी येथे नातेवाईकांकडे आली होती.
मात्र, तिला शुक्रवारी 21 रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास तौसिफखान उर्फ बाबु पठाण (रा. सुरत) या तरूणाने आमिष दाखवून पळवून नेले. दरम्यान, मुलगी घरात नसल्याचे कळताच नातेवाईकांनी तिच्या वडीलांना कळविले. त्यानंतर आज शनिवारी अल्पवयीन मुलीच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादीवरून तौसिफखान उर्फ बाबु पठाण याच्याविरूध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पूढील तपास पीएसआय नाना सुर्यवंशी हे करीत आहेत.