आमोदा अपघात ; जखमी महिलेचा मृत्यू

0

अपघातातील मृतांची संख्या पोहोचली तीनवर ; अनोळखी महिलेची ओळख पटवण्याचे आवाहन

फैजपूर- मंगळवारी आमोद्याजवळ झालेल्या रिक्षा अपघातात रात्री उशिरा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या आणखी एका महिलेचा मृत्यू झाला. या महिलेची ओळख अद्यापही पटलेली नाही. अवैध प्रवाशी वाहतुकीचे रिक्षा अपघातातील ठार झालेल्यांची संख्या आत तीन झाली आहे. मंगळवारी आमोद्या जवळ ओव्हरटेकच्या नांदात अ‍ॅपेरिक्षा पलटी होऊन झालेल्या अपघातात चिनावल येथील सुनीता भंगाळे व बर्‍हाणपूर येथील गायत्री परदेशी यांचा मृत्यू झाला होता. तर अन्य गंभीर जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यातील एका महिलेचा उपचार घेत असतांना मंगळवारी रात्री मृत्यू झाला.