फैजपूर- ट्रकच्या टपावरून बसून प्रवास करणार्या तरुणास विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना 1 मे 2018 रोजी हिंगोणा ते भालोद रस्त्यावर सकाळी सव्वादहा वाजेच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध शुक्रवारी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ट्रक (एम.एच.19 झेड.3881) वरून अविनाश जगन्नाथ तायडे (18, हिंगोणा) हा तरुण प्रवास करीत असताना त्यास विद्युत तारांचा स्पर्श होवून तो चिकटला व जमिनीवर पडल्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी मयत तरुणाचे पालक जगन्नाथ राघो तायडे यांनी फैजपूर पोलिसात तक्रार दिल्याने ट्रक चालक गुलाब खलील तडवी (आमोदा, ता.यावल) विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जिजाबराव पाटील करीत आहेत.