पिंपरी-चिंचवड :- सरकारविरोधात देशात सर्वत्र विरोधातील वातावरण असतांना लोक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी आंदोलने करत आहेत. मात्र, प्रत्येक्षात निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळत आहे. सगळीकडे लोक भाजपला पसंती देत असून कर्नाटकासह सगळीकडे नागरिक आजही भाजपला सरकारला चाहतात. त्यामुळे आम्हाला कोणी शिकविण्याची गरज नाही, असे खडेबोल पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी विरोधकांना सुनावले. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने शहरातील 311 दिव्यांगांना आज (शुक्रवारी) आकुर्डीत येथे कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधनांचे मोफत वाटप करण्यात आले त्यावेळी ते बोलात होते.
गिरीश बापट म्हणाले की, सर्वसामान्य जनेतमुळे आज आपण सर्वजण वेगवेगळ्या पदावर कार्य करत आहोत. त्यामुळे जनतेची सेवा करत असा पदाधिका-यांना सल्ला देत आहे. समाजातील त्यामुळे उपेक्षितांकडे कोणी लक्ष देत नाही. त्यांच्याकडे आम्ही लक्ष देत आहोत, असेही ते म्हणाले.
दिव्यांगांसाठी खर्च करायचा शिल्लक असलेला तीन टक्के निधी जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आला आहे. शिल्लक निधी एकत्रित करुन दिव्यांगांना व्यावसायासाठी कर्ज देण्यात येणार आहे. यासाठी एक योजना आखली असून लवकरच ती कार्यान्वीत केली जाणार असल्याचेही ते म्हणाले.
पिंपरी-चिंचवड महापालिका पैशाने जशी श्रीमंत आहे, तशी मनाने देखील श्रीमंत आहे. पालिकेने दिव्यांगांना पेन्शन योजना सुरु केली आहे. ही कौतुकास्पद बाब आहे. सर्व दिव्यांगांना मदत मिळेल याकडे लक्ष्य देणे गरजेचे आहे. चार टक्के अपंगत्व हा निकष असला पाहिजे असे सांगत बापट पुढे म्हणाले की, गेल्या चार वर्षात राज्य सरकारने अनेक योजना सुरु केल्या आहेत. राज्य सरकारला केंद्र सरकार देखील मोठ्या प्रमाणात मदत करत आहे. सिंचनासाठी 36 हजार कोटी रुपये केंद्र सरकारने महाराष्ट्राला दिले आहेत. कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या योजनांची माहिती घरा-घरापर्यंत नेण्यात यावी. एक कार्यकर्ता आणि दहा लाभार्थी अशी योजना सुरु करण्यात यावी.