मुंबई : आमच्या काळात आम्हीही सर्जिकल स्ट्राईक केले. मात्र आम्ही त्याची जाहिरात केली नाही असा दावा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी एका खाजगी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. आहे.
सर्जिकल स्ट्राईक जाहीर करायचे नसतात. आम्ही ऐवढे केले स्ट्राईक. 62 कॅम्प आम्ही 40 वर आणले. याची वाच्यता आम्ही केली नाही. या गोष्टी सारख्या सांगायच्या नसतात. पण या सरकारला या गोष्टीचे मार्केटिंग करण्याची सवय आहे. बालाघाटमध्ये झालेल्या स्ट्राईकची इतकी चर्चा झाली. वेगवेगळे आकडे सगळे सांगत होते. कोणत्याही धर्माला आपण दहशतवादी म्हणू शकत नाही. दहशतवाद्याला जात, धर्म नसतो. माझ्या पक्षाच्या मिटींगमध्ये मी बोललो. पक्षाच्या मिटींगमध्ये वस्तूस्थिती मांडणे हे माझं कर्तव्य आहे. त्यावेळी मी हे बोललो होतो. हिंदुत्वावर राजकारण करण्याचा भाजपचा धंदा झाला आहे.’ असे देखील सुशील कुमार शिंदे यांनी म्हटलं आहे.