मुंबई : राज्यात मुख्यमंत्री पदावर उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतल्यानंतर भाजपा, महाविकास आघाडीचे नेत्यांमध्ये वाकयुद्ध पहायला मिळत आहे. भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी नव्या सरकारचा शपथविधी घटनाबाह्य असल्याचे विधान केले आहे. याला प्रत्युतरादाखल राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांनी भाजपाला इशारा दिला आहे. लोकसभा सदस्यांनी शपथ घेताना नेत्यांची नावे घेतली होती. तसेच भाजपाने फोडाफोडीचे राजकारण करू नये, आम्ही जर आमदार फोडले तर भाजपा रिकामा होईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.
नवाब मलिक यावेळी म्हणाले की, शपथविधीपूर्वी नेत्यांची नावे घेण्याची प्रथा भाजपाची आहे. लोकसभा सदस्यांनी शपथ घेताना नेत्यांची नावे घेतली होती. भाजपाच्या सर्व खासदारांची शपथ रद्द होईल. भाजपाने दुसऱ्याकडे बोट दाखवू नये असा इशारा त्यांनी भाजपाला दिला.
भाजपाने फोडाफोडीचे राजकारण भाजपाने करु नये, आम्ही जर आमदार फोडले तर भाजपा रिकामा होईल. हिंमत असेल तर भाजपाने मतदान घेऊन बघावं ११९ आमदारही भाजपाकडे नाही. सत्तेची लालसा दाखवून भाजपाने नेत्यांना प्रवेश दिला. आज सत्ता बनत नसल्याने ते आमदारही आमच्याकडे येण्यासाठी उत्सुक आहे. आमच्याकडे १७० चा आकडा आहे असंही नवाब मलिकांनी सांगितले आहे.